नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ५० लाख ६१ हजार १८५ मतदरांनी नोंदणी केली असून जिल्ह्याची मतदान टक्केवारीचे ७५+ हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. बुधवार मतदानासाठी शासनाने सुट्टी घोषित केली आहे. सकाळी ७ ते ९ पर्यंत ६.९३, ९ ते ११ १८.८२ तर ११ ते १ पर्यंत ३२.३५ मतदान झाले आहे. जिल्ह्यात कळवण मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
७ ते १ दरम्यान झालेले मतदारनिहाय मतदान
नांदगाव – ३०.१६
मालेगाव मध्य- ३५.८२
मालेगाव बाह्य- २७.७६
बागलाण- २७.३४
कळवण- ३६.१५
चांदवड – ३४.१९
येवला – ३५.८६
सिन्नर- ३६.४०
निफाड- ३१.८०
दिंडोरी- ४३.२९
नाशिक पूर्व- २८.२१
नाशिक मध्य- ३०.२७
नाशिक पश्चिम- २८.३४
देवळाली- २८.१९
इगतपुरी – ३४.९८
एकुण मतदान – ३२.३५
या आहे सुविधा
ज्या मतदारांना चिठ्ठीवरून मतदान केंद्राची माहिती मिळाली नसेल त्यांना व्होटर हेल्पलाईन ॲपवरून आपले मतदान केंद्र व मतदान यादीतील अनुक्रमांक शोधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच मतदान केंद्राच्या बाहेर आपले सहायता कक्षात मतदान केंद्र अधिकारी हे मतदारांना त्यांचे अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करत आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक मुलभूत सेवा-सूविधा जसे पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॉयलेट, व्हीलचेअर, पाळणाघर व स्वयंसेवक या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण
प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेच्या संनियंत्रणासाठी जिल्ह्यात ३२८० मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात ६४.२१ टक्के मतदान झाले आहे असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नागरिकांनी अधिक उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होवून ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी केले आहे.