शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता…आता हे आहे प्रतिबंध

नोव्हेंबर 18, 2024 | 7:29 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241118 WA0294 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या नाशिक जिल्ह्यातील जाहीर प्रचाराची आज, सोमवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल, असे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार सांगतेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाचे प्रमुख राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, मतदान संपण्याकरिता निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तास आधी म्हणजेच आज दि. 18.11.2024 सायंकाळी 6.00 वाजता निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला आहे. यामुळे मतदान संपण्याकरिता निश्चित वेळ संपण्याच्या 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किवा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत तसेच घेता येणार नाहीत. चलचित्र, दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचाद्वारे कोणतीही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही. या कालावधीत ध्वनीक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय / पक्ष कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशांच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे. याच कालावधीत जनमत कलचाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती इलेक्ट्रॅीनिक माध्यमात प्रदर्शित करणेस मनाई आहे. या तरतुदींचा भंग करेल ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 च्या कलम 126 नुसार शिक्षेस पात्र असेल, असे त्यांनी नमूद केले.

निवडणुका खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून दि. 20 नोव्हेंबर 2024 मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. तसेच दि. 23.11.2024 रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, अवैध पैसा, दारू, भेटवस्तू वाटपावर निर्बंध असणार आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके सतर्क असून याबाबत नागरिकांना सी -विजील (C-Vigil) ॲपवर तक्रार दाखल करता येईल. FST आणि SST पथकासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही त्यासाठी तैनात असतील.

जिल्ह्यात 15 विधानसभा मतदार संघांसाठी एकूण 4922 मतदान केंद्र असून मतदान पथकांना साहित्य वाटप दि. 19.11.2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून संबंधित मतदारसंघांचे साहित्य वाटप केद्रांमधून करण्यात येईल. प्रत्येक मतदान पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी तसेच एक शिपाई कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी असतील. प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे ठिकाणी केंद्रांच्या संख्येनुसार 10 टक्के राखीव मतदान पथके ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात 24610 आणि 2461 राखीव असे एकूण 27071 कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात मतदानासाठी बीयु- 7026 सीयु – 5899 आणि व्हीव्हीपॅट – 6391 वापरण्यात येत आहेत. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रांवर ने -आण करण्यासाठी 511 बसेस, 91 मिनी बसेस आणि 1017 जीप्स या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानासाठी आवश्यक पुरावे – मतदानासाठी येतांना मतदारांनी आयोगाकडून देण्यात आलेले निवडणूक ओळखपत्र (EPIC – Electors Photo Identity Card) ओळखीसाठी आणावयाचे आहे. जर निवडणूक ओळखपत्र नसेल तर आयोगाने निर्धारित करून दिलेल्या 12 पुराव्यांपैकी एक पुरावा ओळखीसाठी आणणे आवश्यक आहे. ओळखीसाठी निर्धारित करणेत आलेले 12 पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये, आधार कार्ड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॅाब कार्ड, बॅंकेचे / पोस्टाचे फोटो असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाकडून जारी करणेत आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत रजिस्ट्रार जनरल यांचेकडून जारी करणेत आलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य सरकार तसेच केंद्र / राज्य सरकारचे उपक्रम सार्वजनिक कंपनी इ. कडून त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी निर्गमित करणेत आलेले फोटो असलेले ओळखपत्र, संसद सदस्य, विधानसभा / विधान परिषद सदस्य यांना जारी करणेत आलेले शासकीय ओळखपत्र आणि सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांचेकडून निर्गमित युनिक डिसॲबिलिटी ( युडीआयडी ) कार्ड आवश्यक असणार आहे. हे पुरावे मुळ प्रतीत ( Hard Copy ) आणावे लागेल. Digital स्वरूपातील पुरावा वापरता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या आत मोबाईल आणता येणार नाही. मतदान केंद्राचे ठिकाणी मतदार सहायता कक्षाचे ठिकाणी बीएलओ उपस्थित राहून मतदारांना मतदान केंद्राच्या मतदार यादी भागातील मतदाराचा अनुक्रमांक शोधून देण्यासाठी मदत करतील. याशिवाय. व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे (Voter Helpline App) मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, मतदार यादी भागातील अनुक्रमांक माहित करून घेता येईल. मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक मुलभूत सुविधा जसे पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॅायलेट, व्हीलचेअर, पाळणाघर, स्वयंसेवक आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि, तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आले आहेत. याशिवाय, मतदान प्रक्रियेचे संनियंत्रणासाठी जिल्ह्यात 3280 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करणेत येत आहे. दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी व्होटर टर्नआऊट (Voter Turnout) ॲपद्वारे नागरिकांना पहाता येईल. दि. 20.11.2024 रोजी मतदान समाप्त झाल्यावर मतदान पथके संबंधित विधानसभा मतदार संघाच्या साहित्य स्वीकृती केंद्राकडे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान पथकांकडून मतदान यंत्रे आणि मतदान साहित्य संकलन केंद्राचे ठिकाणी संकलित करणेत येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समीर भुजबळ यांच्या भव्य रॅलीने वेधले सर्वांचे लक्ष…चौकाचौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी

Next Post

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ राहुल गांधी यांचा मुंबईतून टोला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime112
क्राईम डायरी

बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या साडे तीन लाखाच्या आठ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत…

ऑक्टोबर 3, 2025
MOBILE
क्राईम डायरी

ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा…दुकानादारांना घातला गंडा

ऑक्टोबर 3, 2025
G2P2FzVW4AAIZis 1920x1490 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला दिली भेट

ऑक्टोबर 3, 2025
G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
Untitled 33

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ राहुल गांधी यांचा मुंबईतून टोला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011