नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीचा संपूर्ण कल समोर आला आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीचे आमदार पुन्हा निवडून आले आहे. तर मालेगावमध्ये एमआयएमच्या आमदाराला पुन्हा संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे विजयी झाले. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे यांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, हिरामण खोसकर,माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, दिलीप बनकर यांनाही यश मिळाले आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम) हे अवघ्या काही मतांना विजयी झाले आहे.
येवला
छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 114118
माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 90535
छगन भुजबळ 23583 मतांनी विजयी*
मालेगाव बाह्य
दादा भुसे (शिंदेंची शिवसेना) – 151320
बंडू काका बच्छाव (अपक्ष)- 48880
अद्वय हिरे (ठाकरेंची शिवसेना) – 36553
दादा भुसे 102440 मतांनी विजयी*
चांदवड – देवळा
डॉ राहुल आहेर (भाजप) – 104003
गणेश निंबाळकर (प्रहार)- 55460
डॉ राहुल आहेर 48563 मतांनी विजयी*
नांदगाव
सुहास कांदे (शिंदेंची शिवसेना)- 138068
समीर भुजबळ (अपक्ष)- 48194
डॅा. रोहण बोरसे- (अपक्ष) – 28108
गणेश धात्रक (ठाकरे गट)- 22120
सुहास कांदे 89874 मतांनी विजयी*
दिंडोरी
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 138442
सुनिता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार) – 93910
नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी*
नाशिक पूर्व
राहुल ढिकले (भाजप)- 156246
गणेश गीते (राष्ट्रवादी शरद पवार) – 68429
राहुल ढिकले 87571 मतांनी विजयी*
नाशिक मध्य
देवयानी फरांदे (भाजप)- 104986
वसंत गिते (ठाकरेंची शिवसेना) – 87151
देवयानी फरांदे 17835 मतांनी विजयी*
नाशिक पश्चिम
सीमा हिरे (भाजप) – 140773
सुधाकर बडगुजर (ठाकरेंची शिवसेना)- 72661
सीमा हिरे 68116 मतांनी विजयी*
देवळाली
सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 81297
राजश्री अहिरराव (शिंदेची शिवसेना)- 40463
योगेश घोलप (ठाकरेंची शिवसेना)- 38710
सरोज अहिरे : 40463 मतांनी विजयी*
कळवण
नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार) – 118366
जे पी गावित- 109847
नितीन पवार 8519 मतांनी विजयी*
इगतपुरी
हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार) – 117214
लकी भाऊ जाधव (काँग्रेस) – 30707
हिरामण खोसकर मतांनी 86507 मतांनी विजयी*
सिन्नर
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) – 138565
उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)- 97681
माणिकराव कोकाटे 40884 मतांनी विजयी*
निफाड
दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 120253
अनिल कदम (ठाकरेंची शिवसेना)- 91014
दिलीप बनकर 29239 मतांनी विजयी*
मालेगाव मध्य
मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम)- 109653
आसिफ शेख (अपक्ष) -109491
मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल १६२ मतांनी विजयी
बागलाण
दिलीप बोरसे (भाजप) : 159681
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार)- 30384
दिलीप बोरसे 129297 मतांनी विजयी