मंगळवार, सप्टेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यात आज १५ मतदार संघाची १५ ठिकाणी मतमोजणी…कोणाचा निकाल अगोदर येतो याची उत्सुकता

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 23, 2024 | 12:10 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241122 WA0225


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 69.12 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी 15 मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार (निवडणूक )शाम वाडकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, मतदानानंतर मतदान यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूम मध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहेत. मतमोजणी निरीक्षक यांचे उपस्थितीत ईव्हीएम मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी यांची तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजता करण्यात येवून व संबंधित कर्मचाऱ्यांना टेबल नेमून देण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सकाळी 7.30 वाजता निवडणूक लढविणारे उमेदवार / प्रतिनिधी तसेच आयोगाकडून नियुक्त करणेत आलेले मतमोजणी निरिक्षक यांचे उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडणेत येईल. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कर्मचा्-यांना व मतमोजणी प्रतिनिधींना गोपनीयतेची शपथ देतील. भारत निवडणूक आयोगाकडून 15 विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी निरीक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत. त्यांच्या निगराणीखाली मतमोजणीची संपूर्ण प्रक्रीया पार पडणार आहे.

सकाळी ठीक 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू करणेत येणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय संभाव्य प्राप्त होणा-या टपाली मतपत्रिका लक्षात घेऊन टेबल्सची संख्या निश्चित करणेत आलेली आहे. प्रत्येक टेबलवर एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक, 2 मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर जास्तीत जास्त 500 टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिक मतदारांमार्फत मतदान करून टपालाने प्राप्त होणा-या मतपत्रिकांची मोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपूर्वी ETPBMS प्रणालीतून स्कॅनिंग करून करणेत येणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर ईव्हीएम मतमोजणी प्रक्रीया 8.30 वाजता सुरू करण्यात येईल. याकरीता प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरिक्षक यांची नेमणूक करणेत आर्लेली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ मतमोजणीच्या ठिकाणी माध्यक कक्ष स्थापित करण्यात आला आहे. यात माध्यम प्रतिनधिींसाठी ईलेक्ट्रॅानिक व प्रिंट मीडीया मधील प्राधिकारपत्र प्राप्त प्रतिनिधींची बैठक व्यवस्था करणेत येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणीची आकडेवारी वेळोवेळी माध्यम प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवडणूक लढविणा-या उमेदवारांना टेबलनिहाय एक मतमोजणी प्रतिनिधी नेमता येईल. सदर प्रतिनिधी 18 वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा. तसेच केंद्र राज्य शासनाचा मंत्री / खासदार / आमदार / महापौर / नगरपालिका/ जिल्हा परिषद/ पंचायत समिती सभापती / अध्यक्ष , शासकीय. महामंडळे / उपक्रम यांचा अध्यक्ष, सदस्य , शासन अनुदानित संस्थांमधील व्यक्ती तसेच अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, रास्त भाव दुकानाचे व्यापारी, यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही. मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी संबंधित प्रतिनिधींचे ओळखपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रात नियुक्त कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल व अन्य इलेक्ट्रॅानिक उपकरणे आणण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. केवळ मतमोजणी निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि ENCORE व ETPBMS करीता मान्यता दिलेल्या अधिका-यांना संबंधित कामकाजासाठी मोबाईल सोबत बाळगता येणार आहे. प्रत्येक फेरीनिहाय यादृच्छीक पद्धतीने दोन कंट्रोल युनिट ( CU) निवडून त्यावरील उमेदवार निहाय मतांची खात्री मतमोजणी निरीक्षकांकडून करण्यात येईल. प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी निरीक्षक यांच्या मान्यतेने पडताळणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी घोषित करतील. फेरीनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी आयोगाच्या ENCORE प्रणालीमध्ये भरणेत येणार असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर https://results.eci.gov.in विधानसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेल्या मतांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

टेबलवरील मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निरीक्षक व उमेदवार / प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत यादृच्छीक पद्धतीने 5 मतदान केंद्र निवडून त्यांचे व्हीव्हीपॅट स्लिप्सची पडताळणी कंट्रोल युनिटवरील उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांशी करण्यात येणार आहे. ईव्हीएम व टपाली मतपत्रिकांची मतमोजणी पूर्ण झालेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मा. मतमोजणी निरिक्षक यांच्या मान्यतेने उमेदवार निहाय अंतिमत: प्राप्त मतांची आकडेवारी घोषित करतील निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरी नंतर पडताळणी करून उमेदवार निहाय मिळालेली मते अधिकृतरित्या जाहीर करतील. तसेच सर्व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी निरिक्षक यांच्या मान्यतेने अंतिम निकाल घोषित करतील. त्या व्यतिरिक्त अन्य मार्गाने प्राप्त होणा-या माहितीची उमेदवार / प्रतिनिधी / नागरिक यांनी कृपया खातरजमा करावी. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, त्याव्यतिरिक्त अनधिकृत माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

Screenshot 20241122 161709 Drive 1
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महामार्गावर चुकीच्या बाजूने कार चालवणे बेतले जीवावर…पाच तरुणांचा मृत्यू

Next Post

भिवंडीतील तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

भिवंडीतील तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011