नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्याच्या गोदावरी काठालगत असलेल्या एकलहरे गंगावडी शिवारात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादी जेरबंद झाली. मात्र या परिसरात अजूनही तीन बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिक तालुक्यातील एकलहरे, जाखोरी, कोटमगाव, चाडेगाव, सामनगाव, पळसे या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे..
Nashik Eklahare Leopard Rescue