नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिच्यावर अखेर राज्य सरकारने कारवाई केली आहे. ५० हजार रुपयांची लाच घेताना ती रंगेहाथ सापडली. त्यानंतर तिच्या घराची आणि बँक खात्यांची झडती घेण्यात आली. त्यात मोठे घबाड सापडले आहे. अखेर या सर्व प्रकाराची दखल राज्याच्या शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यानुसार लाचखोर धनगर हिला निलंबित करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे उपसचिव टी वा करपते यांनी काढलेल्या आदेशानुसार, लाचखोर धनगर हिला राज्य शासनाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. धनगर हिला सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय नाशिक हे मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित काळात धनगर हिला खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसे आढळल्यास निर्वाह भत्ता दिला जाणार नाही. निलंबन कालावधीत निर्वाह व पूरक भत्ता दिला जाईल. शिक्षण आयुक्त यानुसार कार्यवाही करणार आहेत.
Nashik Education Officer Sunita Dhangar Suspension