नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात लाचखोरी प्रचंड बोकाळली आहे. जिल्हा परिषदेची शिक्षणाधिकारी, महापालिकेची शिक्षणाधिकारी यांच्यानंतर मुख्याध्यापक आणि संस्थाचालकही लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) सापळ्यात सापडले आहेत. दिवसागणिक शिक्षण विभागामध्ये एसीबीच्या कारवाया वाढत आहेत. आता येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहाय्यक लाच घेताना सापडला आहे. संजय रामदास पाटील (वय ५३ वर्ष) असे या लाचखोराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एक दाम्पत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे अंतिम वेनत देयक तयार करायचे होते. त्यासाठी या दाम्पत्याने शिक्षण विभागात संपर्क केला. लाचखोर पाटील याने २ हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर पाटील हा येवला पोस्ट ऑफिस समोर लाच घेताना रंगेहात पकडले गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
सापळा अधिकारी
साधना भोये, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक-
पो. ह. चंद्रशेखर मोरे
पो. ना. दीपक पवार,
मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
दरम्यान, एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .