नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांची नियुक्ती ही अवघ्या दीड महिन्यांसाठी आहे. कारण, हरकळ हे दीड महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. यासंदर्भात हराळ म्हणाले की, दीड महिना कालावधी माझ्यासाठी काही कमी नाही. एकही कामकाज पेंडिंग राहणार नाही, याची खात्री देतो, अशी ग्वाही हराळ यांनी दिली.
मुख्याध्यापक संघाच्या वतीने नुतन शिक्षणाधिकारी यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी देशमुख यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, हरळ यांना कामकाजाचा मोठा अनुभव आहे. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणे आवय़्क आहे, कार्यालयात दप्तर दिरंगाईचा नियम लागू करावा अशी विनंती केली.
यावेळी कक्ष अधिक्षक शिवाजी शिंदे, जि.प. कक्ष अधिक्षक सुधीर पगार, मुख्याध्यापक संघाचे भागीनाथ घोटेकर, बी.डी गांगुर्डे, किशोर पालखेडकर ,संजय देसले , प्रकाश पानपाटील, शरद गिते, राजेन्द्र महात्मे, एस.टी. म्हस्कर, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाठ, रामराव बनकर, एम.व्ही.बच्छाव, राजेन्द्र लोंढे, जितेंन्द्र राठोड, सी. जे . शेलार, भरत भामरे, किरण नाठे, चेतन पोकणे यांच्यासह मुख्याध्यापक /शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.