नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ई-वाहन धोरण सन २०२१ नुसार रा.प. महामंडळातील किमान १५ टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील वाहने राहतील असा निर्णय झाला आहे. राज्यातील जनतेला पुरेशा प्रमाणात व पर्यावरण पुरक सेवा देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत ५१५० इलेक्ट्रिक बस चालनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात नाशिक विभागात१४ ई-बसेस नाशिक-बोरीवली, नाशिक-स.गड, नाशिक-त्र्यंबक व नाशिक-शिर्डी या मार्गावर चालनात आहे. दुस-या टप्प्यात १० ई-बसेस प्राप्त झाल्या आहे. २८.०८.२०२४ रोजी पासुन या बसेस नाशिक-शिर्डी, नाशिक-सित्रर व नाशिक-त्र्यंबक मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सकाळी ५.०० ते सं. २२.०० वाजेपर्यंत दर एक तासाच्या वारंवारीतेने सदरच्या बसेस नाशिक-सित्रर / नाशिक-त्र्यंबक या नविन बसस्थानकावरुन (ठक्कर) व नाशिक-शिर्डी महामार्ग बसस्थानक येथुन सुरु होणार आहेत.
- सदर बसची वैशिष्टे खालीलप्रमाणे.
१. पर्यावरणपुरक सेवा.
२. सदर बस सेवेमध्ये ५ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत अनुज्ञेय राहील.
३. सदर बस सेवेमध्ये महिला, अमृत जेष्ठ नागरीक, जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे साथीदार अर्जुन / द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, विद्यमान तसेच माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजने अंतर्गत शहीद जवानांच्या विरपत्नी यांना सवलतीच्या दराने प्रवास अनुज्ञेय राहील. सदर पर्यावरणपुरक सेवेचा लाभ घ्यावा.
बघा वेळापत्रक व तिकीट दराचा तक्ता