नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत पत्रकार प्रश्न विचारत असतांना अजित पवार यांनी डोळा मारला. त्यामुळे ही बाब सध्या चर्चेची ठरली आहे.
आजवर दोनदा घडले
प्रसंग १
महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी संवाद साधत असतांना अजित पवार यांनी डोळा मारला होता. आज पुन्हा त्यांनी डोळा मारला. त्यावेळेस या डोळा मारण्याचे नेमके कारण पुढे आले नाही. पण, तेव्हाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
प्रसंग २
आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह आणि नावाविषयी काय, त्यावेळी त्याचे उत्तर पवार यांनी दिले आणि त्यानंतर त्यांनी डोळा मारला. त्यामुळे ही बाब सर्वच कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच, याची सध्या चर्चा रंगत आहे.
समीर भुजबळ यांचे सारथ्य
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच नाशिकला आले. शासन आपल्यादारी या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांचे नाशकात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी केवळ एक दिवसात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अतिशय जय्यत तयारी केली. त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर भव्य रॅलीचे नियोजन केले. शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले. शिवाय नाशिकरोड ते कार्यक्रमस्थळ गंगापूररोड येथपर्यंत समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. त्यामुळे ही बाब चर्चेची ठरली आहे.