नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि जागतिक किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षणासह विविध क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यामुळेच सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या महान कारकीर्दीचा हा आलेख….
-त्यांचे पूर्ण नाव मोरेश्वर सदाशिव गोसावी असे होते.
– त्यांचा फलटण (जि. सातारा) येथे झाला.
– सुसंस्कारी कुटुंबातून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले.
– बी. कॉम., एम.कॉम., एल.एल.बी., साहित्याचार्य अशा सर्व परीक्षांमध्ये ते विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तो एक मोठा विक्रमच होता.
– ‘बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (व्यवसाय व्यवस्थापन)’ या विषयात पीएचडी करणारे ते पुणे विद्यापीठातील पहिले विद्यार्थी होते
– बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून त्यांनी १९५४ मध्ये बीकॉम चे शिक्षण घेतले. याच कॉलेजमध्ये त्यांनी ट्यूटर म्हणून कार्य सुरू केले.
– १९५६ मध्ये त्यांनी एम. कॉम.ची पदवी संपादन केली. आणि ते प्राध्यापक झाले.
– १९५८ मध्ये त्यांनी नाशिकच्या बी.वाय. के. कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य म्हणून प्रारंभ केला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारले आणि हा जागतिक विक्रम झाला.
– १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले
– त्यांनी तब्बल ३७ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. हा सुद्धा जागतिक विक्रम आहे
केवळ पुणे विद्यापीठच नाही तर देशातच व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू करणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांची त्याला जोड देणे यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
बी.बी.ए., बी.एफ.टी., बी.सी.ए. यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांच्या प्रयत्नांमुळेच सुरू झाले.
९०च्या दशकाला प्रारंभ होत असतानाच त्यांनी पत्रकारितेचे महत्व ओळखले आणि नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू केला.
त्यांनी जगभरात अनेक व्याख्याने दिली
भगवदगीतेवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यामुळेच त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसारही केला
श्रीमती मंजुळाबाई रावजीला क्षत्रीय (एस.एम.आर. के.) हे स्वतंत्र महिला कॉलेज त्यांनी नाशिकला सुरू केले. यातून महिलांना मोठी संधी उपलब्ध झाली.
इंजिनिअरींग, फार्मसी, व्यवस्थापन, नर्सिंग, सायन्स, कॉमर्स, आर्टस, कायदा अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम त्यांनी उपलब्ध करुन दिले
काळाचा वेध घेत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू केले
डॉ. एम. एस. जी. सेंटर ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी माहिती तंत्रज्ञान, उद्योजकता विकास, विदेशी भाषाज्ञान यांसारखे पूरक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले.
प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले पण गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा कार्यवाह म्हणून ते जबाबदारी सांभाळत होते.
गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये तब्बल १२६ अभ्यासक्रम त्यांनी सुरु केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी व डॉ. एम.एस. जी. फाउंडेशन फॉर आंत्रेप्रेनिअरशीप अॅण्ड मॅनेजमेंट यांच्यावतीने त्यांनी प्राचार्य, व्याख्याते, मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी ६०हून अधिक शिबिरे आयोजित केली.
पुणे विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या अनुभावाचा मोठा फायदा पुणे विद्यापीठाला झाला.
पुणे विद्यापीठात त्यांनी अकौंटस् कोड तयार केले.
१९७० ते २००५ या काळात ते वाणिज्य व व्यवस्थापन या विषयांसाठी पीएचडीचे मार्गदर्शक होते.
टोकियोमधील ऑल एशिया मॅनेजमेंट कॉन्फरन्समध्ये (मॅन अँड वर्क) हा शोधनिबंध त्यांनी सादर केला.
१९९२ मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘उच्च शिक्षण प्रशासन’ युनिव्हर्सिटी ऑफ ट्वेंट (नेदरलॅण्डस) या विद्यापीठात जे. डी. सी. बिटको आय.एम.एस. आर. या संस्थेची रचना व विकास हा शोधनिबंध उच्च शिक्षणाचा उद्योगक्षेत्राशी अनुबंध निर्माण करणारा म्हणून आदर्श शोधनिबंध ठरला.
‘मॅनेजमेंट गॅप इन डेव्हलपिंग इकॉनॉमी’, ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इकॉनॉमिक सर्व्हे,’ ‘अचिव्हींग एक्सलन्स’, ‘एज्युकेशन प्लस’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
त्यांनी शंभराहून अधिक पुस्तकांचे संपादन व प्रकाशन केले.
व्यवस्थापनविषयक जर्नल्स व नियतकालिकांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले
गोखले एज्युकेशन सोसायटीचा त्यांनी अफाट विस्तार केला
गोखले एज्युकेश सोसायटीचे १६ कॉलेज, २० माध्यमिक विद्यालय, २४ पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, १० कृषी शिक्षण केंद्र, आश्रमशाळा व वसतिगृहे त्यांनी उभारली
संस्थेच्या माध्यमातून आजवर १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली
२००० मध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी पुरस्कार आणि आय.एस.ओ. – ९००१-२०० प्रमाणपत्र (२००३) संस्थेला मिळाला
डॉ. मो स गोसावी यांना राजीव गांधी शांतता पुरस्कार, मास्टर टीचर मिलेनियम पुरस्कार, ‘सर’ ही पदवी, इंटरनॅशनल बायोग्राफिकल असोसिएशन केंब्रिजची फेलोशिप अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.