नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्वानप्रेमी आणि नाशिककरांना एकाच ठिकाणी कुत्र्यांच्या विविध जाती पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे ते ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट आणि पेट परफेक्ट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मे 2022 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित डॉग शो चे. हा डॉग शो त्र्यंबकरोडवरील ग्रेप काऊंटी इको रिसॉर्ट येथे होणार आहे. या डॉग शो मध्ये कुत्रे आणि त्यांच्या पालकांसाठी मजा आणि खेळ असतील. सोबतच कुत्र्यांच्या विविध जातीबाबत मार्गदर्शन आणि तपासणी होणार आहे. पाळीव प्राणी सल्ला आणि त्यांची काळजी या बाबत देखील तज्ञ मार्गदर्शन करतील. अधिक माहिती साठी 7030113008 किंवा 9527315599 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.