नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कधी काळी महामार्ग हे शहराच्या जवळून जायचे त्यामुळे अपघात प्रसंगी वैद्यकीय मदत लवकर मिळत असे परंतु आता सर्व नवीन महामार्ग हे शहरापासून बऱ्याच दूर अंतरावर आहेत त्यामुळे या महामार्गावर काही अपघात झाल्यास तिथपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. या साठी अपघातानंतर पहिल्या गोल्डन अवर मध्ये प्राथमिक उपचार मिळावे या साठी महामार्गावर काम करणारे कर्मचारी, टोलबुथवरील सहाय्यक यांना प्राथमिक उपचार आणि काळजी याचे प्रशिक्षण देण्यासाठी शल्यविशारद यांच्या संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला असून अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रायोगिक तत्वावर समृद्धी महामार्गावर देण्याबाबतचा प्रस्ताव असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया द्वारे शासनाकडे देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. प्रविण सुर्यवंशी यांनी दिली .
नाशिक सर्जिकल सोसायटी तर्फे नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते . समारोप सोहळ्यात युवा सर्जन आणि जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र स्टेट सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. महेश मालु,विख्यात लेप्रस्कोपिक सर्जन डॉ.ज्योत्स्ना कुलकर्णी ,नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॅा. नागेश मदनूरकर, सचिव डॅा. अमित केले, कोषाध्यक्ष डॉ.पराग धामणे,डॉ.निलेश निकम ,डॉ. ,डॉ. नंदकिशोर कातोरे, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे यांची उपस्थिती होती .
जीवन गौरव पुरस्कार
1.डॉ.बी आर .गायकवाड
2. डॉ.सूर्यकांत सोनार
युवा सर्जन पुरस्कार
1.डॉ.सचिन देवरे
2.डॉ.अंबरीश चटर्जी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिल्पा दयानंद यांनी केले. संयोजन समिती सदस्य डॉ. जी बी सिंग,मनिषा जगताप तसेच सर्व सदस्य यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.