नाशिक – शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम शासनामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल तेव्हा काम उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरु असून या कामावर दिवसाला 36 हजार 126 मजूर काम करत आहे, अशी माहिती उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली आहे.
नाशिक विभागात रोहयोची एकूण 7 हजार 830 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 36 हजार 126 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 5 हजार 649 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 23 हजार 027 मजूर काम करत आहेत. तसेच 2 हजार 181 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 13 हजार 098 मजूर दिवसाला काम करत आहेत.
नाशिक जिल्ह्यात 1 हजार 766 कामांवर 7 हजार 770 मजूर कामावर
नाशिक जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 766 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 7 हजार 770 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 938 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 232 मजूर काम करत आहेत. तसेच 828 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 539 मजूर काम करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 941 कामांवर 9 हजार 586 मजूर कामावर
अहमदनगर जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 941 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 9 हजार 586 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 428 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 5 हजार 923 मजूर काम करत आहेत. तसेच 513 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 663 मजूर काम करत आहेत.
धुळे जिल्ह्यात 584 कामांवर 2 हजार 662 मजूर कामावर
धुळे जिल्ह्यात रोहयोची एकूण 584 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 2 हजार 662 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 481 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 2 हजार 47 मजूर काम करत आहेत. तसेच 103 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 615 मजूर काम करत आहेत.
जळगांव जिल्ह्यात 1 हजार 673 कामांवर 8 हजार 92 मजूर कामावर
जळगांव जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 673 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 92 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 388 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 6 हजार 453 मजूर काम करत आहेत. तसेच 285 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 1 हजार 639 मजूर काम करत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 866 कामांवर 8 हजार 16 मजूर कामावर
नंदुरबार जिल्ह्यात रोहयोची एकूण 1 हजार 866 कामे सुरू असून या कामांवर दिवसाला 8 हजार 16 मजूर कामावर आहेत. सदर कामांमध्ये 1 हजार 414 कामे ही ग्रामपंचायत स्तरावरील असून या कामांवर दिवसाला 4 हजार 373 मजूर काम करत आहेत. तसेच 452 कामे ही शासकीय यंत्रणा स्तरावरील असून या कामांवर 3 हजार 643 मजूर काम करत आहेत.