नाशिक – कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 32 लाख 63 हजार 80 डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण 29 लाख 13 हजार 606 नागरिकांचे लसीकरण झाले असून 3 लाख 49 हजार 474 डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 10 लाख 13 हजार 537 नागरिकांचे लसीकरण
नाशिक जिल्ह्याला एकूण 11 लाख 30 हजार 260 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 10 लाख 13 हजार 537 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 64 हजार 138 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 31 हजार 126 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 84 हजार 891 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 32 हजार 792 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 13 हजार 057 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 538 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 6 लाख 30 हजार 91 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 54 हजार 904 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण 6 लाख 85 हजार 141 नागरिकांचे लसीकरण
अहमदनगर जिल्ह्याला एकूण 8 लाख 530 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 6 लाख 85 हजार 141 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 43 हजार 32 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 23 हजार 954 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 41 हजार 745 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 975 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 17 हजार 454 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 671 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 4 लाख 19 हजार 570 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 21 हजार 740 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात एकूण 3 लाख 25 हजार 794 नागरिकांचे लसीकरण
धुळे जिल्ह्याला एकूण 3 लाख 84 हजार 480 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 3 लाख 25 हजार 794 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 15 हजार 536 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 8 हजार 202 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 20 हजार 898 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 6 हजार 674 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 15 हजार 414 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 2 हजार 825 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 355 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 55 हजार 890 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जळगांव जिल्ह्यात एकूण 5 लाख 83 हजार 308 नागरिकांचे लसीकरण
जळगांव जिल्ह्याला एकूण 5 लाख 99 हजार 160 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 5 लाख 83 हजार 308 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 28 हजार 260 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 184 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 40 हजार 119 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 515 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 20 हजार 964 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 4 हजार 847 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 3 लाख 58 हजार 654 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 1 हजार 765 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 3 लाख 5 हजार 826 नागरिकांचे लसीकरण
नंदुरबार जिल्ह्याला एकूण 3 लाख 48 हजार 650 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 826 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 13 हजार 919 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 7 हजार 797 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 34 हजार 704 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 9 हजार 807 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 13 हजार 196 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 1 हजार 734 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 1 लाख 83 हजार 157 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 41 हजार 512 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 10 जून 2021 रोजीची माहिती )