येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील चिचोंडी खुद परिसरातील सैद वस्ती येथे एका शेतात लगत बिबट्याचे बछडा आढळून आला. या घटनेमुळे वस्ती परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बछडा दिसल्याने बिबट्याची मादी सुध्दा जवळपास असल्याची संशय वनविभागाच्या कर्मचा-याना असून, वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तेथे ट्रॅप कॅमेरे लावले. परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचा प्रकार नवा राहिलेला नाही. गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. सिन्नर तालुक्यात बिबट्याने एका शेतकऱ्यावर आणि एका शाळकरीवर हल्ला केल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. आता दोन दिवसापर्वी कळवण तालुक्यात एक बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याची वेगळी घटना घडली. त्यानंतर येवला तालुक्यात बिबट्याचा बछडा आढळला.
कळवण तालुक्यात कोंबड्यांची शिकार करायला गेलेला दीड वर्षाचा बिबट्या खुराड्यात अडकल्याची घटना या शेतकऱ्याला सकाळच्या सुमारास दिसून आली. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे शेतकऱ्याचे लक्ष खुराड्याकडे वेधले गेले. त्यामुळे तो भयभीत झाला. त्याने तातडीने पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक साधनसामग्रीसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या बिबट्याला पकडण्याचे कार्य हाती घेण्यात आली. पथकाने सर्वप्रथम या बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर हा बिबट्या बेशुद्ध झाला. त्याद्वारे बिबट्याला खुराड्यातून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यात आले. येवल्यात आता वनविभाग बिबट्याला कसे पकडतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
A leopard calf was found in yeola taluka
Nashik District Yeola Taluka leopard calf