येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांदा दरवाढ रोखण्यासाठी अचानक निर्यात मूल्य ४० टक्के वाढविल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. येवला येथे स्व. शरद जोशी शेतकरी संघटने तर्फे बाजार समिती समोर मनमाड-येवला महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने तातडीने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करत सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे वाहनाच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागल्या होत्या.
आधीच दुष्काळी परिस्थिती असतांना शेतकऱ्याच्या शिल्लक कांद्याला दोन पैसे जास्त भाव मिळत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने या निर्णयाला आमचा विरोध असल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी सांगितले.
Nashik District Yeola Onion Issue Farmer Agitation
Rasta Roko Agriculture