येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून ठिकठिकाणी बंद मोर्चे निघत आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज अंदरसुल यांच्यावतीने नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुमारे एक तास रोखून चक्काजाम करण्यात आला.
त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अंदरसुल गाव आज बंद ठेवण्यात आले. यात छोटे-मोठे दुकाने ही सर्व कडकडीत बंद होती. रस्ता रोको आंदोलन प्रसंगी संबंधितांवर कारवाई व्हावी व मराठा समाजाला न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली. तसेच आरक्षण लवकरात लवकर मिळावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या विनंतीला मान देऊन रास्ता रोको आंदोलन निवेदन देऊन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, योगेश खैरनार, काकासाहेब देशमुख ,बाळासाहेब जनार्धन पागिरे, दिनेश पागिरे, नंदकिशोर धनगे, संतोष वलटे, अमोल सोनवणे, प्रमोद देशमुख, महेश देशमुख, तेजराज जहागीरदार, सोपान आवटे, शिवाजीराजे वडाळकर, जनार्दन जानराव, दत्तात्रय थोरात, अण्णासाहेब ढोले, अमोल आहेर ,दत्तात्रेय हाडोळे, शंकरराव गायकवाड ,गणपतराव देशमुख, यांच्यासह सर्व समाजातील तरुण मित्र मंडळ या आंदोलनासाठी उपस्थित होते.
Road block by Maratha community in Yewla taluka
Nashik District Yeola Maratha Reservation Rasta Roko Protest Agitation Traffic Jam