येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसावा म्हणून पोलिसांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे,. याचाच एक भाग म्हणून आरोपींची शहरातून थेट धिंड काढली जात आहे. याद्वारे पोलिसांचा वचक निर्माण व्हावा आणि कुणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असा उद्देश आहे.
शहर पोलिस ठाण्यात जबरदस्तीने खोटे दस्तऐवज बनवून जमीन खरेदी करण्यात आली. याप्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना देखील लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची गंगा दरवाजा ते पोलीस स्टेशन या मार्गावर धिंड काढण्यात आली.
शहरात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे कायदा व्यवस्था धोक्यात येत आहे. त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर वाढत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसावा यासाठी ही धिंड काढण्यात आली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या पुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी अशा आरोपींविषयी माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केली आहे.
Yeola crime news
Nashik District Yeola Crime Suspects March