येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कडुनिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले आहेत. तसेच काही साहित्यही आढळून आले आहे. क्रीडासंकुला लगतचा हा प्रकार संशयास्पद असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सुध्दा या ठिकाणी आले. हा सर्व प्रकार जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन असून संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येवला शहर पोलिसांकडे केली आहे. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय कुऱ्हाडे, आयुब शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Nashik District Yeola Crime Superstition Complaint