येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. यावेळी येवल्यातील विंचूर चौफुली येथे या शिवशक्ती यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने पंकजा मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
पंकजा मुंडे या येवला शहरात दाखल होताच रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसात देखील त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. ही माझी शिवशक्ती परिक्रमा आहे. सकाळी एका देवाचे दर्शन घेतले आणि आता पुढे दर्शनाला निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे. त्या आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहे.
या यात्रेतून त्या विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देणार आहेत. जनतेशी संवादही साधणार आहेत. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत पंकजा मुंडे यांची ही परिक्रमा सुरू राहणार आहे. या काळात त्या पाच हजार किलोमीटरचा त्या प्रवास करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या यात्रेचे सर्व ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. येवल्यातही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत जेसीबीने फुलांची उधळण करुन केले.
BJP leader Pankaja Munde’s Shivshakti Yatra in Yeola received a warm welcome
Nashik District Yeola BJP Leader Pankaja Munde Welcome Politics