माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
नाशिक जिल्ह्यातीलकाही द्राक्षे बागायतदारांच्या विनंतीवरून येत्या ५ दिवसातील वातावरणीय घडामोडीची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्षे, कांदा, व रब्बी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन ते बुधवार दि.,८ मार्च पर्यन्त गडगडाटीसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची तर मंगळवार दि.७ मार्च ला गारपीटीची शक्यता जाणवते.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार दि.६ मार्च पासुन दुपारच्या कमाल व पहाटेच्या किमान तापमानात घसरण होवून उष्णतेची काहिली कमी होईल.
सध्या द्राक्षे काढणी चा हंगाम चालु असु फळात शुगर वेगाने स्थिरावण रोध निर्मितीसाठी तसेच फळाची टवटवी व ग्रीनिश शेड टिकवणीसाठी सध्या बऱ्याच फळबागेत पेपर लावलेला असुन पावसामुळे ह्या क्रियेचा हेतू सफल होण्याऐवजी फळघडाचे नुकसान होवून फंगस चे आक्रमण होवु शकते. त्याच बरोबर इतर पिकांचेही नुकसानही पावसामुळे होवु शकते.
कोणत्या वातावरणीय घडामोडी आहेत कि ज्यामुळे येत्या ५ दिवसात हे घडण्याची शक्यता जाणवते.
देशाच्या वायव्य दिशेकडून बं. उ. सागराहून येणारे तसेच अरबी समुद्राहून नैरुक्तेकडून वायव्य भारताचा दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या दोन्ही आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याच्या शक्यतेमुळे ह्या वातावरणीय घडामोडी ह्या ५ दिवसात घडून येण्याची शक्यता जाणवते.
सध्या पावसाचा कालावधी हा जरी ४ ते ८ मार्च विभागाकडून सांगण्यात आला तरी प्रत्यक्षात सोमवार दि. ६ मार्च संध्याकाळपासुन ते बुधवार दि. ८ मार्च पर्यन्त ( त्यातही विशेषतः सोमवार व मंगळवार च्या रात्री) नासिक जिल्ह्यातील सिन्नर नाशिक येवला नांदगाव दिंडोरी कळवण सटाणा मालेगाव देवळा तसेच खान्देश नगर पुणे सातारा औरंगाबाद जालना बुलढाणा हिंगोली वाशिम जिल्हे व लगतच्या भागापर्यन्त ह्याची व्यापकता जाऊ शकते.
या क्षेत्रात गडगडाटीसह तुरळक ठिकाणी किरकोळ (अंदाजे २ते १० मिमी) पावसाची शक्यता जाणवते, असे वाटते.
4 March, राज्यात पुढच्या 3,4 दिवसात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाउस, गडगडाटासहची शक्यता.
काही ठिकाणी ढगाळ वातावरण.
IMD GFS model guidance for coming 4 days given here. pic.twitter.com/Eu4IkFOsIK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 4, 2023
पाऊस किती होतो, त्या पेक्षा पाऊस कश्या पद्धतीचा होतो, ह्यावर शेतीपिकांचे नुकसान अवलंबून आहे.
कारण पावसाबरोबर गडगडाट व अगदीच तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.आणि येथेच ह्याची भिती थांबत नाही. तर पाऊस जरी मोज मापी भाषेत २ ते १० मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी २० ते २५ किमी वेगाचा असु शकतो. आणि हा वाराच कदाचित जास्त फळबागा व रब्बी पिकांचे नुकसान करण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पावसापेक्षा ज्याला आपण वावधन म्हणतो त्या वाऱ्याचीच भिती एकंदरीत जास्त जाणवते.
आता येथे सर्व शक्यता वर्तवल्यानंतर त्याची भयावता किती समजायची?
कारण हे सर्व घडलं तर त्याची शक्यता ही अगदीच थोड्या काळापुरतीही असु शकते.
तेंव्हा आता शेतकऱ्यांनी ठरवायची कि ह्याची भिती किती बाळगायची. इतकेच ह्यावर विवेचन करून संकल्पना स्पष्ट करता येईल. ह्यातूनच काय सावधानता बाळगता येवू शकते हे ठरवावे, इतकेच!
Nashik District Unseasonal Rainfall Forecast