सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील कापड दुकानातून साड्यांची चोरी करणा-या सहा महिलांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या महिलांनी साड्यांची चोरी करुन पळ काढला. पण, अवघ्या काही तासांतच या महिलांना मुद्देमालासह वावी पोलिसांनी अटक केली.
या चोरीबाबत समजेलली हकीकत अशी की, नांदूरशिंगोटेत आनंदा सांगळे यांच्या कापड दुकानात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुकानात सहा अनोळखी महिला व दोन पुरुष आले. त्यानंतर आणखी दोन तरुण दुकानात आले व त्यांनी अंतर्वस्त्रे खरेदी करायचे असल्याचे सांगितले. या गर्दीत चोरट्या महिलांनी बोलण्यात गुंतवून साड्या चोरल्या. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. साड्या आवडल्या नाही असे सांगत महिला खाली आल्या. त्यांच्यापाठोपाठ दुकानात आलेले दोघे तरुण बाहेर पडले. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन रिक्षांमधून मधून ते निघून गेले. महिलांच्या वर्तनाबाबत संशय वाटल्याने सांगळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात महिलांनी साड्या चोरुन नेल्याचे दिसून आले.
अशा सापडल्या माहिला
या महिलांनी साडेसहा हजार रुपयांच्या साड्या चोरल्या होत्या. त्यानंतर दुकानदाराने ही चोरीची माहिती नांदूरशिंगोटे पोलिस चौकीत दिली. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह वावी पोलिसांना पाठविले. रात्री दहाच्या सुमारास लोखंडे यांना पिंपरवाडी शिवारातील टोलनाक्यावरुन जाणाऱ्या दोन रिक्षांबाबत संशय बळवला. लोखंडे यांनी वाहन आडवे लावून एक रिक्षा थांबवली. त्यातील तीन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोन्ही रिक्षांमधील सहा महिला व दोन पुरुषांना पोलिस ठाण्यात आणले. नांदूर येथून सांगळे कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात पोचलले. त्यांनी सर्वांना ओळखले. रिक्षाची झाडाझडती घेतल्यावर चोरीस गेलेल्या काही साड्या पोलिसांना मिळून आल्या.
यांना झाली अटक
या चोरी प्रकरणात शरनाबाई सुभाष जाधव (५०), संगीता दशरथ जाधव (५८) दोघी रा. अंबरनाथ, ललिता परशुराम जाधव (५५) रा. बेलापूर, ता. पंढरपूर, सावित्री विनायक गायकवाड (४८), सरुबाई हुसैनी जाधव (७०), छाया मरगू जाधव (४५), नागेश तुकाराम जाधव (५०), संतोष विनायक गायकवाड (२२) सर्व रा. आनंदनगर, अंबरनाथ यांना अटक केली आहे.
Nashik District Sinner Saree Theft 6 Women Arrest Crime