सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवी वस्तीकडे येणारे बिबटे आता थेट हल्ले करीत असल्याचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जाणाऱ्या शेतकऱ्यावर थेट बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. आता बिबट्याने शाळकरी मुलीवर अचानक झडप घातल्याची बाब समोर आली आहे. तालुक्यातील दापूर येथील या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील दापूर येथील गोनाई मळा परिसरात सकाळी घडली. संस्कृती किरण आव्हाड असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या काही महिन्यात बिबट्याचे हल्ले वाढले असून त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात संस्कृतीच्या मानेला व तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहे. जखमी झालेल्या संस्कृतीला कुटुंबियांनी तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला
दबा धरून बसलेल्या बिबट्याने सकाळी संस्कृती शेतात असताना हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्यानंतर तीन आरडाओरड केली. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कटुंबिय आल्यानंतर बिबट्याने पळ काढला. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
nashik district sinner leopard attack girl injured
forest wild animals rural dapur