नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील महड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी विश्वास अहिरे शेतातील पाहणी करण्यासाठी गेले असता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी आरडा ओरड केली आणि ते घराकडे पळत असतांना पुन्हा मागून येत बिबट्याने पुन्हा हल्ला केला. घरातील लोक मदतीला येताच बिबट्या मात्र पळून गेला. यात विश्वास अहिरे जखमी झाले. त्यांना तातडीने नामपूर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
यापूर्वी सिन्नर तालुक्यात दोन तर नाशिक शहरात एक घटना घडली आहे. दोन दिवसापूर्वी निफाड तालुक्यातील एक गंभीर प्रकार समोर आला. एकाचवेळी दोन बिबट्यांनी दुचाकीस्वारावर थेट हल्ला केला. त्यात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. मानवी वस्तीकडे येणाऱ्या बिबट्यांनी आता थेट आक्रमक हल्ले सुरू केल्याची बाब निदर्शनास येत आहे.
Farmer injured in leopard attack in bagalan Nashik District Satana Leopard Attack Farmer