सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील साल्हेर किल्ला परिसरात दमदार पाऊस होत असल्याने नदी-नाले खळखळून व्हाऊ लागले आहेत. सर्वत्र निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याने हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत असून यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाच वातावरण पसरले आहे.
त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिध्द असलेल्या पहिणे घाटामध्ये रविवारची सुटीचा आनंद घेण्यासाठी पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी गर्दी करुन पर्यटनाचा आनंद लुटला. सध्या मान्सूनने देशाचा बहुतेक भाग व्यापला आहे. कोठे ढगफुटीमुळे कहर, कोठे पुरामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे तर ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलोट गर्दी करीत आहेत.
त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबक-घोटी रोडवरील पहिणे घाटातही अंजंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरांवरुन असंख्य धबधबे कोसळत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढु लागली. अनेक पर्यटकांनी ठिकठिकाणी धबधब्याखाली भिजण्याचा तसेच नदीच्या पाण्यात बसण्याचा आनंद घेतला. असाच पाऊस साल्हेर किल्ला परिसरात झाला. त्यामुळे नदी-नाले वाहू लागले असून पर्यटकांमध्ये उत्साह आहे.
बघा साल्हेर – मुल्हेर परिसरातील व्हिडिओ