नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या सततच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पेठ, दिंडोरी, येवला, चांदवड, मालेगाव, निफाड व कळवण या तालुक्यांसाठी रु.७३१९.९२ लक्ष इतक्या किमतीच्या ११६.५३ किमी लांबीच्या १६ कामांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. सदर कामे मंजूर झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन शेतमाल वाहतुकीच्या दृष्टीने मदत होणार आहे.