नाशिक – शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच दमदार पाऊस होत असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. आगामी काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर, या पावसामुळे धरणसाठ्यातही वाढ होण्याची चिन्हे आहेत.
आज दिवसभरात झालेल्या पावसाची नोंद अशी