नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी व नाल्यांद्वारे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, धरणाची पाणी पातळी वाढत आहे. करंजवण धरणाचे (R.O.S) परिचालन सूची नुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन केले जाणार आहे. त्यामुळे करंजवण धरणाच्या गेटमधून/सांडव्याद्वारे कादवा नदीत अशीच आवक चालू राहिल्यास नजिकच्या काळात पूरपाणी सोडावे लागणार आहे. परिणामी, दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी काठच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. संबंधित गावांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाघाड कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता हे पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Nashik District Rainfall Kadava River Flood Alert for Villages