मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हडपसर – पुणे एक्सप्रेसने प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन मनमाड येथे गळ्यातील चैन जबरीने तोडून नेल्याबाबत १६ ऑगस्ट रोजी मनमाड पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सुरू असताना रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाचे विश्लेषण करून यातील आरोपी प्रवीण श्रीमंत काळे उर्फ इंडियन श्रीमंत काळे याला ताब्यात घेतले.
त्यानंतर या चोरांकडून गुन्ह्याविषयी विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल दिली. त्यानंतर गुन्ह्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन लगड स्वरूपात त्याच्याकडून हस्तगत करण्यता आली. ही चोरी उघड झाल्यानंतर पोलिसांनी अजून कसून चौकशी केल्यानंतर रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे दाखल असलेले ३ जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले. त्यानंतर एक चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला असून असे एकूण पाच गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. पाचही गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता सोन्याची ४४ ग्रॅम हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी लोहमार्ग औरंगाबाद पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम , पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक संपत राठोड, सुरेश सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश पवार, पोलीस हवालदार रवींद्र खडतकर पोलीस नाईक महेंद्र पाटील ,संतोष भालेराव, सुशील भावसार ,किशोर कांडले अमोल खोडके, पोलीस शिपाई राज बच्छाव, मनजीत पाटील यांनी पार पाडली तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप देस्वाल , धर्मेंद्र यादव सागर वर्मा ,मनीष कुमार दीपक सानप आदींनी पार पाडली.
indiadarpanlive #manmad #City #railway #police station
Nashik District Railway Police RPF Thieve Crime Arrest