नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा मतदारसंघातील नाशिक आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये तेरा ठिकाणी रेल्वे गेट उभारणीच्या कामाला गती देण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली.विविध ठिकाणी रेल्वे गेट नसल्याने स्थानिक रहिवाशांची आणि रस्ता ओलांडू पाहणार्या वाहनधारकांची मोठी कुचंबांना होत असते.रेल्वे फाटकाच्या ठिकाणी अनेकदा लांबच लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या असतात.नागरिकांना आणि वाहनधारकांना या त्रासातून दिलासा देण्यासाठी रेल्वे गेट लवकरात लवकर उभारणे गरजेचे आहे.यासाठी लागणाऱ्या जागा ,जमिनींची तातडीने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना खा.गोडसे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
नाशिक, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये माणिकखांब, घोटी ,जानोरी, नांदूरवैद्य ,वंजारवाडी ,लोहशिंगवे ,भगूर, संसरी,बेलगाव, मालधक्का ,गोरेवाडी ,शिलापूर आणि ओढा या तेरा ठिकाणी रेल्वे गेट उभारणीचा प्रलंबित आहे.विषय मार्गी लावण्यासाठी खा.गोडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी डी गंगाथरण,निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे,प्रांत तेजस चव्हाण,तहसिलदार राजेंद्र नजन,अनिल दौंडे,परमेश्वर काळुसे आदीसह रेल्वे,मनपा,पीडब्यूडी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना खा.गोडसे यांनी जिल्हा प्रशासनाला वरील सूचना केल्या.
वरील तेरा ठिकाणच्या गाव शिवारात रेल्वे फाटक असल्याने लोहमार्ग ओलांडताना स्थानिक रहिवाशी आणि वाहनधारकांची मोठी कुचंबन होत असते.रेल्वे गेट परिसरात अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.या त्रासातून स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांची सुटका व्हावी यासाठी खा. गोडसे यांच्या पुढाकाराने रेल्वेगेट उभारणीचा प्रस्ताव आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे गेट उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने स्थानिक रहिवासी आणि वाहनधारक त्रस्त आहेत.या विषयाच्या सातत्याने तक्रारी माझ्याकडे येत असतात.नागरिक आणि वाहनधारकांची या त्रासातून,कुंचबनेतून सुटका करण्यासाठी रेल्वेगेट लवकरात लवकर उभारणे गरजेचे आहे.यासाठी लागणाऱ्या जागा,जमिनी तातडीने हस्तांतरण करून घेण्याच्या सूचना यावेळी खा.गोडसे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Nashik District Railway Line Gate Work