नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे चोरट्यांनी थेट एटीएम फोडल्याची बाब समोर आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास साधारण तीन ते चार वाजता हा प्रकार घडला आहे. चिंचखेड चौफुलीवरील एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल २८ लाख रुपये चोरून नेले आहेत.
ही घटना चिंचखेड चौफुली या अत्यंत गजबजलेल्या परिसरात झाली. या ठिकाणचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कट्टरच्या साह्याने फोडण्यात आले. महागड्या कारचा वापर करून चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली असून हे चार चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पिंपळगाव बसवंत ही कांद्याची बाजारपेठ असून एटीएम फोडल्याच्या या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.
बघा व्हिडिओ
Nashik District Pimpalgaon Baswant ATM Centre Theft
Crime Rural Police HDFC Bank