पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्यात टोमॅटो उत्पादकांची लॉटरी लावणारा टोमॅटो आता मात्र रुसला आहे. गेल्या महिन्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केले. आता मात्र, टोमॅटोचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. भाव कमालीचे घसरल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून आपला संपात व्यक्त केला आहे.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचे दर चालू सप्टेंबर महिन्यात अक्षरशः १००ते २५०रुपये प्रति क्रेटस पर्यंत घसरल्याने उत्पादक चिंतेत आहे. मंगळवारी पिंपळगाव बाजारसमितीत मोहाडी येथील शेतकऱ्याच्या टोमॅटोस अवघा १०० रुपये प्रति क्रेटस प्रमाणे बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यानी बाजारसमितीच्या आवारात टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीत गेल्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी टोमॅटोस प्रति क्रेटस २६५१ रुपयांचा दर मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादकांना वाढत्या दराचा काही अंशी लाभ मिळाला. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक उभे केले असताना त्याच ऑगस्ट महिना अखेर टोमॅटोचे बाजारभाव ५००ते ७०० प्रति क्रेटस पर्यंत हळूहळू खाली ओरसल्याने शेतकऱ्यांच्या मनात बाजारभाव टिकून राहावी अशी आशा कायम असतानासप्टेंबर महिना प्रारंभी पासून बाजारभाव ५००रुपये प्रति क्रेटसपर्यन्त खाली उतरत जवळ १०० ते २५० पर्यंत येऊन ठेपल्याने या तुटपुंज्या दरामुळे साधी मजुरी देखील सुटणारी नसल्याने संतप्त शेतकऱ्यानी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो फेकून आपला रोष व्यक्त केला आहे.
अवघा १०० रुपये प्रति क्रेटस भाव
पाच लाख कर्ज काढून टोमॅटो पिकाची लागवड केली. निर्यातक्षम दर्जाचे टोमॅटो पाणी नसताना टँकरने पाणीपुरवठा करून पिके जगविले. आज अवघा १०० रुपये प्रति क्रेटस भाव मिळाल्याने अतीव दुःख होत आहे.
हेमंत पाटील मोहाडी, संतप्त शेतकरी
The farmer expressed his anger by throwing tomatoes at Pimpalgaon Baswant
Nashik District Pimpalgaon Baswant APMC Tomato Prices Farmer
Agriculture Agitation