नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा वृत्तसेवा) – पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाबाबत शासन अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदे निश्चित करण्यासाठी मंगळवार 6 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधितांनी नमूद वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी केले आहे.
ग्रामविकास विभागाच्या 4 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या असाधारण भाग चार-ब क्रमांक 371 ते 375 या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांबाबत सध्या लागू असलेल्या आरक्षण समाप्ती नंतर येणाऱ्या दिवसापासून पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त व भटक्या जमातीसह) तसेच महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग) सभापती पदांची संख्या राखीव ठेवण्यात आली आहे.
अशी आहे राखीव सभापती पदांची संख्या…
अ अनुसूचित क्षेत्रातील पंचायत समित्यांच्या आरक्षित करावयाच्या सभापती पदांची संख्या
1. अनुसूचित जमाती 02
2. अनुसूचित जमाती (महिला) 03
ब अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित पंचायत समित्यांकरिता आरक्षित करावयाच्या सभापती पदांची संख्या
1. अनुसूचित जाती 00
2. अनुसूचित जाती (महिला) 01
अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित पंचायत समित्यांकरिता आरक्षित करावयाच्या सभापती पदांची संख्या.
3. अनुसूचित जमाती 01
4.अनुसूचित जमाती (महिला) 02
5. नागरिकांचा मागास प्रवर्ग 00
6. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 01
7. सर्वसाधारण 02
8. सर्वसाधारण (महिला) 03