सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

by Gautam Sancheti
डिसेंबर 12, 2022 | 7:08 pm
in स्थानिक बातम्या
0
4 1140x570 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षासाठी ८९४.६३ कोटींचा नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. तसेच २०२२-२३ यावर्षात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी व्यपगत होणार नाही, याची काळजी घेण्यात येवून सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, नितीन पवार, दिलीप बोरसे, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, मुफ्ती मोहम्मद खलिफ, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त नियोजन प्रदीप पोतदार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी जतिन रहेमान यांच्यासह सर्व यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत नोव्हेंबर 2022 अखेर सर्वसाधारण योजनेत 600 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 222 कोटी प्राप्त निधीच्या अनुषंगाने 90.89 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी 79.33 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच आदिवासी उपयोजना अंतर्गत 179.77 या प्राप्त निधीच्या अनुषंगाने 110.82 कोटी निधी वितरित करण्यात आला असून 107.42 कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेच्या निधी खर्चाबाबत राज्यात नाशिक जिल्हा 5 व्या तर विभागात 2 ऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे आदिवासी उपयोजनेच्या खर्चाच्या अनुषंगाने राज्यात नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिली.

गावातील ट्रान्सफॉर्मर बंद असल्यास ते 48 तासांत दुरुस्त करण्यात यावे, शासनाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी कार्यवाही होत नाही तेथे विलंबच्या कारणांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात यावा. अतिवृष्टी व सतत़च्या पावसामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी त्यांना शासनाच्या वतीने पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाची प्रलंबित प्रकरणे येत्या आठवड्यात निकाली काढण्यात यावीत. त्याचप्रमाणे भात पिकासाठी असणाऱ्या शासनाचे धोरण व शेतकऱ्यांच्या मागणी नुसार पीक कापणी प्रयोग राबविण्यात यावेत, असे निर्देश यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, वनपट्टे वाटप करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने फळबाग लागवडीकरीता आवश्यक ते सहाय्य करण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजाणी करतांना तेथे वीज पुरवठा अखंडीतपणे देण्यात यावा, असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

या बैठकीत उपस्थित आमदार यांनी आपल्या भागात येणाऱ्या अडचणी सांगितल्या व त्यानुसार अपेक्षित कार्यवाही करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनांबाबत प्राप्त व वितरीत निधी तसेच खर्च झालेल्या निधीची माहिती देण्यात आली.

दृष्टीक्षेपात जिल्हा नियोजन 2023-24:
2023-24 या वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रुपये 501.50 कोटी, आदिवासी उपयोजनेतंर्गत रुपये 293.13 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रुपये 100.00 कोटी अशी तिनही योजनांसाठी एकूण रुपये 894.63 कोटी इतकी आर्थिक मर्यादा शासनाने कळवली आहे.

सर्वसाधारण योजनेच्या 2023-24 वर्षासाठी आराखड्यात प्रस्तावित बाबी
आरोग्य विभागासाठी रुपये 37.85 कोटी
शाळा खोली दुरुस्ती व वर्ग खोली बांधकामासाठी रुपये 17.65 कोटी
लघुपाटबंधारे (0 ते 100 हेक्टर) योजनांसाठी रुपये 34.50 कोटी
रस्ते विकास (3054 व 5054) योजनांसाठी रुपये 58.00 कोटी
क्रिडांगण व व्यायामशाळांच्या विकासासाठी रुपये 14.00 कोटी
ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान योजनेसाठी रुपये 25.00 कोटी
महाराष्ट्र नगरोत्थान अभियान योजनेसाठी रुपये 26.00 कोटी
सामान्य विकास पध्दती व सुधारणांसाठी म.रा.वि.वि.कं.म. सहाय्यक अनुदाने या योजनेंसाठी रुपये 22.00 कोटी
वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संरक्षण योजनेसाठी रुपये 22.50 कोटी
वन क्षेत्रातील मृद व जलसंधारण कामांच्या योजनेसाठी रुपये 22.00 कोटी
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 करीता रुपये 53.40 कोटी
आदिवासी उपयोजना 2023-24 च्या आराखड्यात प्रस्तावित बाबी

आरोग्य विभागासाठी मागील वर्षी असलेल्या तरतुदीपेक्षा (21.48 कोटी) पेक्षा 2.11 कोटी अधिक तरतुद एकूण तरतुद रुपये 23.59 कोटी
पेसा योजनेसाठी रुपये 55.86 कोटी
विद्युत विकासासाठी रुपये 17.10 कोटी
महिला बालकल्याण व पोषण आहारासाठी रुपये 22.50 कोटी
रस्ते विकासासाठी रुपये 30.04 कोटी
अनुसूचीत जाती उपयोजनेच्या 2023-24 च्या आराखड्यात प्रस्तावित बाबी

ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये प्राथमिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रुपये 32.00 कोटी
पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी रुपये 7.35 कोटी
लघु पाटबंधारे योजना रुपये 19.35 कोटी
बिरसा मुंडा क्रांती योजना रुपये 5.85 कोटी
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना रुपये 26.90 कोटी
नागरी भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये प्राथमिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रुपये 50.00 कोटी
महिला व बालकल्याणसाठी रुपये 1.00 कोटी
कृषी व कृषी संलग्न व्यवसायासाठी रुपये 2.85 कोटी
क्रीडा क्षेत्रासाठी रुपये 4.92 कोटी

Nashik District Planning Committee Meeting Decisions
DPC Dada Bhuse Development

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीज बिलात तुम्हाला मिळेल एवढ्या रुपयांची हमखास सवलत; फक्त हे करा

Next Post

धनुष्यबाण चिन्हाचा वाद : निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
Next Post
eknath shinde uddhav thakre

धनुष्यबाण चिन्हाचा वाद : निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011