पेठ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजाळी येथे एसटी बस आणि कार यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८वर करंजाळी जवळील वळणावर हा अपघात झाला आहे. एसटी महामंडळाची ही बस पेठ आगाराची आहे. ही बस (क्र. एमएच ४०, वाय ५९७४) पेठहून पुणे येथे जात होती. तर, सनी कार (क्र . जीजे o६ , एफसी ३३३१) ही नाशिकहून गुजरातकडे जात होती. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि कार यांच्याक समोरा समोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर, कारमधील २ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच, कारमधील एक जण गंभीर जखमी आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तत्काळ अॅम्ब्युलन्स बोलवून गंभीर जखमी व्यक्तीला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातात बसमधील काही प्रवाशीही किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Nashik District Paint Road ST Bus Car Accident