येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांद्यावरीळ निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. काल पासून जिल्ह्यातील बाजारपेठ बंद झाल्या. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात विविध संघटनांचे आंदोलन सुरू केले. येवला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कांद्याच्या माळा गळ्यात घालत विंचूर चौफुली येथे महेंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मालेगावमध्ये कांद्याच्या गोणीची अप्पर जिल्हाधिकारीला भेट
मालेगाव मध्ये स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात जात अधिका-यांना वाळलेल्या मक्याचे पिक तसेच कांद्याची गोणी भेट देत निवेदन दिले. कांद्याच्या खर्चात व उत्पादनात ताळमेळ नाही, शेतक-याला दोन पैसे मिळत असतांना केंद्राने निर्यातमूल्य वाढविल्याने शेतक-याला नुकसान सोसावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सध्या पाऊस नसल्याने शेतक-यांची पिक हातची गेली असून गुरांना चारा-पाणी उपलब्ध होत नसल्याने तातडीने मालेगाव तालूक्यात चारा छावण्या उभाराव्या अशी मागणी यावेळी स्वराज्य संघटनेतर्फे करण्यात आली
kanda andolan
Nashik District Onion Issue Yeola Rasta Roko Malegaon Agitation
Protest Agriculture Export Duty