नाशिक – नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच विक्रमी लसीकरण झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी लसीकरण मोहिमसध्या सुरू आहे. आज शनिवारी (१४ ऑगस्ट) दिवसभरात तब्बल ५४ हजार ४८६ जणांना लस देण्यात आली आहे. जेव्हापासून लसीकरण झाले तेव्हापासूनची ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची भीती असल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारकडून लस उपलब्ध होत असून शहरासह जिल्ह्याला जशा लस प्राप्त होत आहेत. तसे लसीकरण होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसात लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने लसीकरणालाही वेग आला आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब आहे.