योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पाळीव मेंढ्याने राहत्या घरीच ठोस दिल्याने वृद्धाच्या पोटामध्ये गंभीर दुखापत झाली. या वृद्धाला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती निफाड पोलिसांनी दिली आहे.
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील रहिवासी रामदास बाबुराव सूर्यवंशी (वय ६५ वर्षे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याबाबत निफाड पोलिसाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रामदास सूर्यवंशी यांना त्यांच्या राहत्या घरी पाळीव मेंढ्याने ठोस दिली. या घटनेत त्यांच्या पोटास गंभीर मार लागला. निफाड येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निफाड पोलिसांनी दिली, याबाबत निफाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे नांदुर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik District Niphad Senior Citizen Death