नाशिक : सामाजिक जाणिवेतून युनायटेड व्ही. स्टँड फांउडेशनतर्फे मंगळवारी (दि.१) दिवसभर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील मेटकावरा पाडा, वेधपाडा, चाफेची वाडी यासह अनेक आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबाना तब्बल तीनशे किराणा किटचे वाटप केले. यामुळे गोरगरीब आदिवासींच्या चुल पेटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले होते. यावेळी आदिवासी कुटुंबियांनी या फांउडेशनच्या सदस्यांचे हात जोडून आभार मानले. यावेळी युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनचे सागर मटाले, अंकुश चव्हाण, शिवम पाटील, गुरु सिंग, शुभम गोऱ्हे, निलेश पवार, ओम काठे, अमोल पवार, संतोष मुंढे, राहुल काकड, कुणाल पाटील, नयन झगडे, अक्षय गवळी, महेंद्र पोरजे, हरिष सिंग, गौरव आव्हाड, रोहन कुमावत, कल्पेश वाणी, युगंधर दोंदे, अमित कस्तुरे, गौरव रहाणे, गिरीष गलांडे यांच्यासह साक्षी फुगे, रश्मी हिरे, सुजाता मटाले, अश्विनी कांबळे, स्मिता वाघ, श्वेता सोनवणे, अनुष्का मटाले आदी तरुणी देखील उपस्थित होत्या.
पावसातही नाही थांबला मदतीचा हात
मंगळवारी (दि.१) नाशिक शहरासह इगतपुरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. आदिवासी पाड्यांवर मदत
पुरविण्यासाठी गेलेल्या या सदस्यांना पहिल्या पावसाचा सामना करावा लागला. पण भर पावसातही या तरुणांनी
आपला मदतीचा हात मागे न घेता सायंकाळी उशिरापर्यन्त भर पावसात आदिवासींच्या वाड्यावर जावून किराणा किट वाटप केले.
पुरग्रस्तांना मदतीचा हात
युनायटेड वि स्टँड फांऊडेशनतर्फे आजवर आपत्ती काळात अनेकांचा मदतीचा हात दिला आहे. कोल्हापूरसह इतरत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीतही या फांऊडेशनतर्फे तब्बल सहा मालट्रक भरुन जिवनावश्यक वस्तुंची मदत पुरविण्यात आली होती. तेव्हा देखील फांऊडेशनच्या सदस्यांनी मागे न हटता गोरगरीबांसह पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता.
ऑक्सिजन वितरणात देखील सक्रीय
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. या काळात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून १०० ऑक्सिजन सिलिंडर पुरविले. सदर ऑक्सिजन सिलिंडर गरजुंपर्यन्त पोहचविण्याचे मोलाचे काम या युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनच्या माध्यमातून पार पडले आहे.
असे होते किराणा किट
युनायटेड वि. स्टॅड फांउडेशनतर्फे पुरविण्यात आलेल्या किराणा किट मध्ये पीट ५ किलो, तांदूळ ३ किलो, बेसण १ किलो, तुरदाळ १ किलो, रवा १ किलो, मीठ, हळद, तेल, बिस्कीट, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, ओआरएस पावडर, मास्क, सॅनिटायझर आदींचा समावेश होता.