नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी आज एक मोठा एसटी अपघात टळला आहे. यापूर्वी सप्तशृंग गडावर घाटात थेट एसटी बस कोसळली होती. त्यात काही प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर आता नांदुरी गावात मोठा अपघात झाला आहे. एसटी बसचा थेट स्टेअरिंग रॉडच तुटला. त्यामुळे बस थेट बॅरिकेडसवर जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही.
स्टेअरिंग रॉड तुटल्याने अनियंत्रित झालेली बस सुदैवाने बॅरिकेटिंग वर जाऊन आदळल्याने मोठा अपघात टळला. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात ही घटना घडली. अपघातग्रस्त बस नाशिकहून अर्जूनसागरकडे जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बसमध्ये ३७ प्रवाशी करत होते. या घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जिवीतहनी टळली.
बसची प्रचंड दुरवस्था
राज्यात एसटी महामंडळाच्या १३००० बसेस मधून ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. काही बसेस नव्या आल्या असल्या तरी काही बसेस कालबाहय् झाल्या आहे. तर काहींची स्थिती खराब आहे. त्यात नियमीत मेन्टनेस होत नसल्यामुळे त्यांची स्थिती खराब आहे. काही बसेसचे जुने पार्ट बदलले जात नाही. त्यामुळे असे अपघात होणे, बस बंद पडणे हे वारंवार घडत आहे. गेल्या आठवड्यात गळक्या बसचा व्हिडिओ राज्यभर गाजला. तर याच महिन्यात ज जळगाव- बांबरुड या धावत्या बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे असे अपघात होऊ नये यासाठी बसच्या व्यवस्थापने सजग राहणे गरजेचे आहे.
The steering rod broke at Nanduri and the bus hit the barricading…..
Nashik District Nanduri ST Bus Accident Kalwan Saptashrungi Gad