नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील जामदरी शिवारात जामदरी पांझण चौफुलीवर एक धक्कादायक घटना घडली आहे. मळगाव-नांदगाव या एसटी बसला अपघात झाला आहे. भरधाव वेगात असताना बसचे पाटे अचानक तुटले. त्यामुळे बसला अपघात झाला. बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उतरली. या अपघातात बस मधील १५ शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदुरी येथे अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला
जिल्ह्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी गेल्या महिन्याच्या अखेरीस एक मोठा एसटी अपघात टळला. यापूर्वी सप्तशृंग गडावर घाटात थेट एसटी बस कोसळली होती. त्यात काही प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर आता नांदुरी गावात मोठा अपघात झाला आहे. एसटी बसचा थेट स्टेअरिंग रॉडच तुटला. त्यामुळे बस थेट बॅरिकेडसवर जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. स्टेअरिंग रॉड तुटल्याने अनियंत्रित झालेली बस सुदैवाने बॅरिकेटिंग वर जाऊन आदळल्याने मोठा अपघात टळला. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात ही घटना घडली. अपघातग्रस्त बस नाशिकहून अर्जूनसागरकडे जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बसमध्ये ३७ प्रवाशी करत होते. या घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहनी टळली.
बसची प्रचंड दुरवस्था
राज्यात एसटी महामंडळाच्या १३००० बसेस मधून ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. काही बसेस नव्या आल्या असल्या तरी काही बसेस कालबाहय् झाल्या आहे. तर काहींची स्थिती खराब आहे. त्यात नियमीत मेन्टनेस होत नसल्यामुळे त्यांची स्थिती खराब आहे. काही बसेसचे जुने पार्ट बदलले जात नाही. त्यामुळे असे अपघात होणे, बस बंद पडणे हे वारंवार घडत आहे.
जळगाव जिल्ह्यातही अपघात
गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात बसचा रॉड तुटल्याने बस अपघात झाला होता. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांब्रुड गावासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव डेपोची बस निघाली होती. ही बस धावत असताना शिरसोली गावाजवळ तिच्या पुढील चाका जवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र, समयसूचकता दाखवत अनुभवी असलेल्या चालक हेमंत पाटील यांनी बस कशी तरी रस्त्याच्या बाजूला लावण्यास यश मिळविले. मोठा अनर्थ टळला.
काही दिवसापूर्वी गळत्या बसमधून चालक बस चालवत असतांनाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. जुन्या बसेसची स्थिती व त्यातून होणारे अपघात आता नवीन नाही. पण, त्याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून अशी सेवा देणे म्हणजे घातक आहे.
In Nandgaon, the bus fell into a drain due to broken rails
Nashik District Nandgaon ST Bus Accident Students Injured