नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी नांदगाव येथे सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते सामील होते. याच आंदोलनात आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला.
संभाजीनगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार अनिल आहेर, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, अजित पवार गटाचे विजय चव्हाण, ठाकरे गटाचे संतोष गु्प्ता हे सुध्दा सामील झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यात देवेंद्र फडणवीस विरोधातही घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या वेळी छायाचित्रकार विक्की कदम यांचे भाषण लक्षवेधी ठरले. या आंदोलनामुळे वाहतूकीची कोंडी काही काळ झाली.
सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले. पण, १० दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. त्यामुळे जालन्याच्या आंदोलन सुरुच राहणार आहे.
बघा, नांदगावमधील आंदोलनाचा हा व्हिडिओ
nandgaon sakal maratha samaj andolan
Nashik District Nandgaon Maratha Reservation Agitation Video
Shivsena Shinde Faction MLA Suhas Kande