मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालूक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच कांद्याचे निर्यात मूल्य कमी करावे या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी मनमाड येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनमाड-चांदवड मार्गावर बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केले.
सध्या जनावरांना चारा-पाणी उपलब्ध होत नसल्याने चारा छावण्या उभाराव्या, पाऊस नसल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे,तर पिक हातची गेल्याने सरकारने नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच कांद्याचे निर्यात मूल्य कमी करावे या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला,
अर्धा तास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती. पूर्व भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांद्याचे निर्यात मुल्य ४० टक्के केल्यामुळे शेतक-यांमध्ये संताप आहे. अशा स्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट सक्रिय झाला आहे.
Nashik District Manmad Rasta Roko Nandgaon Drought
Rainfall UBT Shivsena Protest Agitation Demand