मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानी नागरिकासोबत पुनर्विवाह केल्याप्रकरणी मालेगावची एक महिला एटीएसच्या रडारवर आली आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तिची कसून चौकशी सुरू केली आहे. अचानक एटीएसचे पथकाने ही चौकशी सुरु केल्यामुळे मालेगावमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
मालेगावची ही महिला पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) ने या प्रकरणी महिलेचा जबाब नोंदल्याची माहिती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षा करणाऱ्या CISF तसेच विमान वाहतूक महासंचानालयाला आलेल्या मेलवरून ही माहिती समोर आली आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या महिलेला चौकशीसाठी बोलविले. त्यानंतर तिची कसून चौकशी केली जात आहे.
मालेगावचे माहेर असलेल्या या महिलेचा मराठवाड्यातील एका व्यवासायिकाशी विवाह झाला होता. त्यानंतर तिचे पाकिस्तानी नागरिकाशी सुत जुळले. ती त्याच्यासोबत पळून गेली होती. त्यानंर तिने त्याच्याशी पुर्नविवाह करून परदेशातही राहिली होती. काही दिवसांपूर्वी ती मालेगावमध्ये माहेरी परतली आहे. आता ही महिला तिच्या पालकांसोबत राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ATS कडून तिची कसून चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराचा दहशतवादी कारवायांशी काही संबंध तर नाही ना, याचीही चौकशी केली जात आहे. याबाबत एटीएस कडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
Nashik District Malegaon Women ATS Enquiry Pakistan Connection
Anti Terrorist Squad Marriage