मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २७ लाखाची चोरी करणा-या आरोपीला पोलिसांनी सुरतमध्ये अटक केली आहे. गेल्या महिन्यात एका यंत्रमाग कारखान्याच्या ऑफीस मधून बेमालूमपणे घुसून २७ लाखाची चोरी झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोराला पकडले.
अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाल्यानंतर पोलिसांना आरोपीचे सुगावे लागले. त्यानंतर पोलिसांची एक टीम सुरत येथे पोहोचल्यावर अथक परिश्रमा नंतर सुरत येथून जुम्मन शाह सुलेमान शाह याला ताब्यात घेतले. आरोपी जुम्मन याने सुरत मध्ये लुटलेल्या पैशातून एक घर व एक रिक्षा सुध्दा घेतल्याच समोर आले असून या चोरीच्या प्रकरणात आणखी त्याचे पाच साथीदार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
गेल्या महिन्यात मालेगावमधील सरदारनगर भागात असलेल्या अन्वर शकील अहमद यांच्या सिल्व्हर किंग यंत्रमाग कारखान्याच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने केबिन मधील टेबलच्या ड्रॉवर ठेवलेले तब्बल २७ लाख रुपये लंपास केले. या चोरीची ही सर्व घटना सीसीव्ही मध्ये कैद झाली होती. आझादनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्याचा शोध घेतला
अशी केली होती चोरी
चोरटयाने या पावरलुम कारखान्याच्या बाहेरील अगोदर दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन त्यानंतर कॅबिनची काच फोडली. कॅबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर टेबलच्या आतल्या कप्प्यात ठेवलेले २७ लाख १६० रुपये त्याने थैल्यात भरले. अन अवघ्या पाच मिनिटात तेथून पोबाराही केला. या घटनेत रोकड भरलेली पिशवी उचलत नसल्याने खांद्यावर ठेवून चोरटा पसार झाला. या घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच भागातील मदरशांमधील हॉस्टेलमधून तीन लाखांपेक्षा अधिक रकमेची चोरीची घटना अगोदर झाली होती. त्यानंतर ही चोरी झाली.
The accused who stole 27 lakhs in Malegaon was arrested
Nashik District Malegaon Textile Theft Suspect Arrested
Rural Police Surat Team Investigation Crime