नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हात सुमारे ८५० हेक्टर जमीन उद्योगासाठी संपादनाची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. जिल्हातील कृषी प्रक्रिया,वाईन,पैठणी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकलसह विविध क्षेत्रातील गुंतवणूकीबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहता सिन्नर, मापारवाडी, राजूर बहूला, घोटी, वाडीव-हे, जाबूटके, मनमाड या ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत ७० टक्के पेक्षा जास्त जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. उर्वरीत भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित प्रशासनाला दिल्या असल्याचही माहिती त्यांनी दिली.
येथे औद्योगिक विकासाशी निगडीत कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळे ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शन सेंटर उभारण्याबाबत त्रंबक रोडवरील खादी ग्राम उद्योग केंद्रातील ५० हेक्टर जमीनी बाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुध्दा यात लक्ष घालत आहेत. त्याचप्रमाणे नाशिक येथे आयटी पार्क बाबत या पूर्वीच जागा उपलब्ध करून दिली होती. पण त्यावेळी आयटी कंपन्यानी पुणेमध्येच राहणे पसंत केले. पण नंतरच्या काळात नाशिकमध्ये अनेक आयटी कंपन्यानी काम सुरू केले. त्यांच्या मागण्याचा विचार करून आक्राळेत १०० एकर जागा उपलब्ध करून देत आहोत असेही सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पांजरापोळ बाबत समितीचा अहवालात प्राप्त झाला आहे. यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
असे झाले भूसंपादन
राजूर बहुला- १४४ हेक्टर
मापारवाडी – २३० हेक्टर
जाबूटके – ३० हेक्टर
घोटी इगतपुरी – २६७ हेक्टर
मनमाड – २०० हेक्टर
अशी एकूण – ८०० पेक्षा जास्त हेक्टर जमीन भूसंपादन केले जात आहे.
Nashik District Industry Land Acquisition Minister Uday Samant