बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल : ताजे अपडेटस् जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

by Gautam Sancheti
डिसेंबर 20, 2022 | 12:59 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात दुस-या टप्प्यामध्ये एकूण १९६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी रविवार मतदान पार पडले. आणि आज मतमोजणी होत आहे. या निवडणूक निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे ताजे अपडेटस आपण आता जाणून घेणार आहोत…

नाशिक तालुका निकाल
नाशिक तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे निकाल जाहीर झाले आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने ५ जागा जिंकत वर्चस्व मिळवले आहे. शिंदे गटाला २ तर भाजपला २ जागा मिळाल्या आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली तर दोन अपक्ष सरपंच या निवडणुकीत निवडून आले आहेत. येवला विधानसभा मतदासंघातील ११३ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ८५ सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले.
नाशिक तालुका – सरपंच निकाल असा
शिवसेना ठाकरे गट

दुडगाव – एकनाथ बेझेकर
सामनगाव – कविता जगताप
ओढा – प्रिया पेखळे
गणेश गाव- मालती डहाळे
तळेगाव – रवींद्र निंबेकर
भारतीय जनता पक्ष
यशवंत नगर – अगस्ती फडोळ
एकलहरे – अरुण दुशिंग
शिवसेना शिंदे गट
गिरणारे – किरण कोरडे
महिरावणी- कचरू वागळे
काँग्रेस
देवरगाव – पर्वता पिंपळेके
राष्ट्रवादी काँग्रेस
साडगाव – सुरेश पारधे
अपक्ष
लाडची – लेखा कळाले
बेळगाव ढगा – शरद मांडे

नाशिक जिल्ह्यातील अन्य महत्त्वाचे निकाल असे
– मुंढेगाव सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर विजयी
– वासाळी सरपंचपदी सुनीता कोरडे यांची निवड
– आशेवाडी सरपंच पदी साहेबराव माळेकर विजयी
– पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे भास्कर बनकर २१३ मतांनी विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांच्यासह भाजपचे सतीश मोरे यांचा पराभव
– पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर भास्कर बनकर विजयी. भास्कर बनकर गटाचे १२ सदस्य विजयी. भाजपच्या सतिश मोरे गटाचे ४ सदस्य विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर गटाला केवळ एकच जागा. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे माजी सभापती राजेश पाटील यांच्या पत्नी, छाया पाटील व  भाजपाचे सतिश मोरे यांच्या पत्नी शितल मोरें निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेचे किरण लभडे यांच्या पत्नी रेखा लभडे विजयी

– उमराळे बुद्रुक येथे जनसेवा पॅनलची बाजी. शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख विलास केदार व ज्येष्ठ नेते जे डी केदार यांच्या पॅनलला मोठे यश. सर्व उमेदवार विजयी
– निळवंडी सरपंच पदासाठी चारोस्कर विजयी
– शिंगवे येथे गोकुळ गीते यांच्या जय मल्हार पॅनलला मोठे यश. ११ जागांसह सरपंचपदाचे उमेदवार विजयी
– येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. कोटमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष पराभूत
– मालेगाव ग्रामपंचायत अपडेट जाटपाडे ग्रामपंचायत थेट सरपंचपद.. काका-पुतण्याच्या लढाईत काकाची सरशी. काका भागचंद तेजा यांचा विजय तर पुतण्या ज्ञानेश्वर तेजा पराभू
– निळवंडी येथे परिवर्तन पॅनल ची बाजी
– कोकणगाव खुर्द सरपंच पदी यशवंत डंबाळे विजय
– शिवसेना नेते नितीन आहेर यांची वडाळीभोई ग्रामपंचायत सरपंचपदी निवड
– पेठ तालुका ग्रामपंचायत निरगुडे (क) सरपंचदी बेबीनंदा सुरेश खंबाईत यांची थेट निवड

श्रीमंत ग्रामपंचायत नागापूरचा निकाल असा
मनमाड पासून जवळच असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र पवार हे थेट सरपंचपदी ९०३ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार  तर रघुनाथ सोमासे  यांचा पराभव झाला. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मोजक्या श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक नागापूर ही ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील निवडणूक राज्यभर चर्चेत होती. या ग्रामपंचायतीचा निकाल अखेर लागला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत होते. तर त्यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेची ठरली. रविवारी या नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत झाली. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त तिसरे पॅनलही येथे होते. त्यामुळे येथे कोणाच्या हाती सत्ता जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नांदगाव तालुक्यात थेट सरपंचपदी निवड झालेले उमेदवार असे
– बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे
– लोढरे -ज्योती प्रमोद निकम .(शिंदे गट)
– हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर (शिंदे गट)
– धोटाने खुर्द – शरद अशोक काळे
– लक्ष्मीनगर – मीराबाई शंकर उगले
– भार्डी – अनिता अशोक मार्कंड
– हिसवळ – शांताराम पवार
– मुळडोंगरी – जन्याबाई पवार
– धनेर – मनीषा वाघ
-पिंपखेड – जीवन गरुड
– तळवाडे – शीतल निकम

सिन्नर तालुक्यातील हे आहे थेट सरपंच
सिन्नर – सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून यात ठाणगाव, डूबेरेवाडी, वडगाव पिंगळा, लोणारवाडी व कारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाचे थेट सरपंच निवडून आले. तर शहा, सायाळे, पाटपिंप्री, उजनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव गटाचे सरपंच निवडून आले आहेत.

सिन्नर तालुक्यातील हे आहे थेट सरपंच
नांदूरशिंगोटे – शोभा बरके,
शहा- संभाजी जाधव,
सायाळे- विकास शेंडगे,
पाटपिंपरी- नंदा रमेश गायकवाड,
किरतांगळी- कुसुम शांताराम चव्हाणके,
डुबेरेवाडी- दत्तू गोफणे,
कारवाडी- रूपाली निलेश जाधव,
वडगाव पिंगळा- शेवंताबाई गेनू मुठाळ,
लोणारवाडी- जयश्री सदाशिव लोणारे,
आशापुर- सुलोचना सिताराम पाटोळे,
ठाणगाव- नामदेव शिंदे, तर
उजनी- निवृत्ती लहानू सापनर

निफाड तालुका सरपंचपदाचे विजयी उमेदवार
पिंपळगांव ब. – भास्कर बनकर (ठाकरे गट )
निमगांव वाकडा – पूजा दरकरे – (राष्ट्रवादी)
थेटाळे – शितल शिंदे – (राष्ट्रवादी काँग्रेस)
तारुखेडले – अनुसया आंधळे – ( ठाकरे गट)
खानगांव थडी – भाऊसाहेब दौंड – (भाजप)
दिक्षी – योगेश चौधरी (ठाकरे गट)
खडक माळेगांव -जगदीश पवार (अपक्ष)
नांदर्डी -जयश्री जाधव (राष्ट्रवादी)
कोटमगांव – आरती कडाळे (भाजपा)
लोणवाडी – पल्लवी साळवे (राष्ट्रवादी)
बोकडदरे – विजय सानप (राष्ट्रवादी)
कसबे सुकेणे- आनंदा भंडारे (अपक्ष)
कोकणगांव- सुरेखा मोरे
मांजरगांव- वंदना सोनवणे (अपक्ष)
पिंपळस- निशा ताजने (भाजप)
साकोरे मिग- शोभा बोरस्ते (राष्ट्रवादी)
शिंगवे -सुशीला पवार (अपक्ष)
सोनेवाडी खु. -नंदा आव्हाड (राष्ट्रवादी )
धारणगांव- वीर दिपक सोनवणे (राष्ट्रवादी)
चांदोरी- विनायक खरात (ठाकरे गट)

येवला तालुक्याचे सरपंच पदाचे निकाल
येवला : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ पैकी ४ जागा मिळाल्या तर ठाकरे गटाला या निवडणुकीत २ जागा मिळाल्या. एक जागा अपक्षाने जिंकली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरूणांना संधी मिळाली आहे. सकाळी दहा वाजता तहसिल कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली तर दोन तासात सर्व निकाल हाती आले. निकाल ऐकण्यासाठी संबंधीत गावच्या पॅनल समर्थकांनी तहसिल कार्यालय आवारात गर्दी केली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोषही साजरा केला.

येवला तालुक्याचे सरपंच पदाचे निकाल
कुसुर – सुरेखा तुकाराम गायकवाड – बिनविरोध – राष्ट्रवादी
एरंडगाव खुर्द : योगीता शिवाजी खापरे (३६७)- राष्ट्रवादी
नांदेसर : सुनीता रावसाहेब जाधव (४२५) – राष्ट्रवादी
नायगव्हाण : सुनील सुर्यभान साळवे (४८७) – ठाकरे गट
चांदगाव : प्रणव शांतीलाल साळवे (४७२) – ठाकरे गट
कोटमगाव बुद्रुक : राजेंद्र चिंतामणी काकळीज (६६७) – राष्ट्रवादी
आडगाव चोथवा : रामकृष्ण दत्तात्रय खोकले (८०८) – अपक्ष

Nashik District Grampanchayat Election Updates

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या नागापूरचा असा आहे निवडणूक निकाल

Next Post

सीमा भागातील मराठी माणसांवर पाळत… महाराष्ट्राने असा वचपा काढावा… जयंत पाटलांनी विधिमंडळात केली ही मागणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
jayant patil

सीमा भागातील मराठी माणसांवर पाळत... महाराष्ट्राने असा वचपा काढावा... जयंत पाटलांनी विधिमंडळात केली ही मागणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011