नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा बँकेकडून जमिनीच्या होणार्या लिलावाची धास्ती घेतल्याने एका शेतकर्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. बँकेच्या जाचामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप करीत शेतकऱ्याच्या नातलगांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वणी ग्रामीण रुग्णालयात शेतकऱ्याच्या नातलगांनी आक्रोश केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पिंपरी अंचला येथील शेतकरी दिलीप अमृता चौधरी (वय ४९) यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. जिल्हा बँकेने त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. नोटिसाही पाठविल्या होत्या. यामुळे चौधरी कुटुंब तणावाखाली होते. कर्ज वसुलीसाठी जमिनीचा लिलाव करण्याची तंबी बँकेने दिल्याने दिलीप चौधरी धास्तावले होते, त्यातच हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Farmer dies of heart attack
Nashik District Dindori Farmer Death Ndcc bank recovery
Rural