देवळा (इंडिया दर्पण वृ्तसेवा) – शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील खामखेडा गावात ही घटना घडली आहे. केदा रवींद्र नामदास (वय ६ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तो इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या दुर्दैवी घटनेनंतर आई- वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. तसेच, खामखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर खामखेड्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेंढपाळ व्यवसायानिमित्त नामदास कुटुंबीय खामखेडा गावात स्थायिक झाले होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे दुपारी मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर त्यांना केदा हा बराच वेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबीयांना त्याची आजूबाजुच्या परिसरात शोधाशोध केली.
पण, हा शोध घेतल्यानंतर केदा मात्र कुठेच आढळून आला नाही. अखेर गावाजवळच असलेल्या शेतामध्ये असलेल्या खड्ड्याच्या पाण्यात तो आढळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारापूर्वीचं डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
A six-year-old boy drowned in a pit in a field in Deola taluka
Nashik District Deola Small Child Death Drown Water Farm Land Pond